नवापूर दि १६(प्रतिनिधी) महाराष्ट्रातून गुजरातथेत अवैध विदेशी दारूचा कंटेनर पोलिसांनी सापळा रचून चौकशीअंती ताब्यात घेतला आहे. यांत कंटेनर कर्नाटक पासिंग, चालक राजस्थानी यामुळे दारू महाराष्ट्रातून कि कर्नाटकातुन ,दारू गूजराथेत की, राजस्थानला जात होती हे पोलिस तपासात निष्पन्न होईल.
महाराष्ट्रातून गुजरात राज्यात दारुची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहिती नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली त्यांनी नंदुरबार जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्श व सूचनेनुसार नवापूर व विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व स्थानिक गून्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावालगत महालक्ष्मी हॉटेल समोर संशयास्पद कंटेनरची तपासणी केली असता गाडी चालक उडवा उडवीची उत्तरे देत होता. यावेळी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर कंटेनरमध्ये अवैधरीत्या वाहतूक होणारा सुमारे ४६ लाख ५ हजार ३२० रुपयांची विविध कंपन्यांच्या विदेशी दारू साठा आढळून आला. यावरून प्रकाश नरसिंगराम देवासी वय 20 रा. गंगाणी ता. बावडी जि. जोधपूर (राजस्थान) कंटेनर न kA 51 B9974 सह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर के.ए.५१ बी ९९७४ या क्रमांकाच्या कंटेनर वाहनांतून विदेशी बनावट दारूचे एकूण 23 लाख 32 हजार 800/- रुपये किमतीचे इम्पेरीयल ब्ल्यू ब्लेंडर ग्रेन व्हिस्की चे 648 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम. एल. च्या एकुण 31.104 नग काचेच्या वाटल्या,3 लाख 88 हजार 080/- रुपये किमतीचे राॅयल चॅलेंज फिनेस्ट प्रिमियम व्हिस्की चे 98 खाकी रंगाचे खोके, त्यात 750 एम.एल.च्या एकुण 1176 नग काचेच्या बाटल्या,3 लाख 79 हजार 440/- रुपये किमतीचे राॅयल चॅलेंज फिनेस्ट प्रिमियम व्हिस्की चे 93 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम.एल.च्या एकूण 4464 नग काचेच्या वाटल्या. 5000/- रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, झालानी मेडीकोचे ई-वे बील 15 लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलैंड कंपनीचा कंटेनर क्रमांक KA-51 B-9974 असा एकुण 46 लाख 05 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.तसेच खोटे बनावट E-Way Bill, Tax Invoce बनवून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून गुजरात राज्यात अवैध विदेशी दारु विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला म्हणून त्याचेविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं. 204 / 2023 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108, सह भा.द.वि. कलम 420, 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उप निरीक्षक भूषण बैसाणे, पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील सहा. पोलीस उप निरीक्षक युवराज परदेशी, पोलीस हवालदार पंकज पाटील, दिनेश वसुले, राजेश येलवे, पोलीस नाईक किशोर वळवी, योगेश थोरात, अतुल पानपाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश बसावे, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र ठाकुर, विशाल नागरे, दादाभाई मासुळ, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र काटके, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.