Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या लाभासाठीशेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी- जिल्हाधिकारी मनिषा खत्री

नंदूरबार दिनांक.30 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
          प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत 14 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार यासाठी 1 मे 2023 पासून गावपातळीवर सर्वत्र मोहिम राबवून ई-केवायसीसाठी सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी ),व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडीया पोस्ट पेमेंट बँकत (आयपीपीबी) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. केंद्र शासनाने पीएमकिसान पोर्टलवर शेतकरी सदरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामाईक सुविधा केंद्रामध्ये  तसेच अँड्रॉईड मोबाईलवर पीएमकिसान ॲप वर सुद्धा लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांनी स्वत:चे ई-केवायसी प्रमाणिकरण तसेच इतर 50 लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी करता येणार आहे.
             तरी पीएम सन्मान योजनेचा अंखडीत लाभ घेता यावा यासाठी  सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीसाठी आपले आधारकार्ड घेवून सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर तसेच नजीकच्या पोस्ट कार्यालयात जावून ई-केवायसी करावी. जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार असल्याने लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे आवाहन श्रीमती खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.