Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुमुक्षू नेहा गोलेच्छा ने ऐहिक गोष्टींचा त्याग म्हणून दिक्षा घेतली. हजारो लोकांसमोर सोळा अलंकार आणि वैभवाचा त्याग करून साध्वीची दीक्षा घेतली.

अक्कलकुवा दि २९ (प्रतिनिधी) येथील मुमुक्षू नेहा नरेशचंद गोलेच्छा ने जैन भागवती साध्वीची दिक्षा घेतली असून नवीन नाव साध्वी श्री निर्वेदनिधी श्री जी म सा धारण करण्यात आले आहे.
                 मुमुक्षू नेहा गोलेच्छा ने ऐहिक गोष्टींचा त्याग म्हणून विविध साहित्य उधळत मुख्य दीक्षा घेतली. हजारो लोकांसमोर सोळा अलंकार आणि वैभवाचा त्याग करून साध्वीचीीजैन भागवती  दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर तिने सर्व सांसारिक कर्मकांडापासून पाठ फिरवली नेहा ने शेवटच्या वेळी भावाच्या मनगटावर राखी बांधली. नातेवाईक आणि कुटुंबीयांनी तिला उत्तम आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी जैन संतांंनी  दिक्षा सोहळ्याला उपस्थितांनी आशीर्वाद दिले.
              मुमुक्षू नेहा नरेशचंद गोलेच्छा हीने जैन धर्माची भागवती दीक्षा स्विकारली. त्या निमित्ताने परमपूज्य शासन प्रभावक, नमिऊणतीर्थ प्रणेता खरतरगच्छाचार्य श्री जिनपीयुष सागरसूरीश्वरजी महाराज साहेब, एवं अष्टापद तीर्थ प्रेरिका प.पू. साध्वी श्री जिन शिशुप्रज्ञाश्रीजी म.सा. एवं आदी साधु-साध्वी भगवंत यांच्या उपस्थितीत शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेत विविध बँडपथक, नृत्यपथक उपस्थित होते. यावेळी मुमुक्षू नेहा गोलेच्छा ही भव्य अश्या सजलेल्या रथावर बसली होती, तिच्या हस्ते वर्षीदान केले तसेच २१०० बुंदीचे पाकिट वाटप करण्यात आले. सदर शोभायात्रेचे प्रवचन सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी प.पू. आचार्य भगवंत श्री जिनपीयूष सागरसूरीश्वरजी म.सा. यांचा मुखारविंदने मंगलाचरण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प. पू. साध्वी श्री मंजुलाश्रीजी म.सा. एवं प. पू. साधु भगवंत श्री सम्यकरत्नसागरजी म.सा., यांनी जैन भगवती दिक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री आचार्य भगवंत यांचा मांगलिक द्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संध्याकाळी भव्य बिदाई समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध शब्द सम्राट ईशान डोशी व प्रसिद्ध संगीतकार पारस भाई गडा यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी जैन समाजातील यूवक यूवती, सामाजिक मंडळांकडून मुमुक्षु नेहा गोलेच्छा यांचा सत्कार करत अभिनदंन पत्र देण्यात आले. यावेळी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह जैन समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.