Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा व अक्कलकुवा येथील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले, पोलिसांत गून्हा दाखल

सातपुडा मिरर......
      अक्कलकुवा:-  गलोठा ता अक्कलकुवा येथून अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले आहे .तशी तक्रार पालक  रा.गलोठा यांनी अक्कलकुवा पोलिसांत दिली असून भादंवि कलम ३६३ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे.
               पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीयांचे राहते घरातून अज्ञात इसम नाव गाव माहित नाही.कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गलोठा खु. ता. अक्कलकुवा येथून अल्पवयीन  वय १४ वर्ष ६ महिने व्यवसाय- घरकाम रा. गलोठा खु. ता. अक्कलकुवा जि. नंदूरबार 
 हिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. गुन्ह्याचा तपास पोसई रतेश राऊत करीत आहेत.

    तळोदा:-   तळोदा येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले आहे अशी फिर्याद  धानकावाडा तळोदा येथील महिलेने दिली असून तिचा फिर्यादीवरून भादंवि कलम ३६३ प्रमाणे फिरोज वसंत धानका रा.धानकावाडा ता तळोदा याचा विरोधात अल्पवयीन मुलीस काहीतरी फूस लावून पळवून नेले म्हणून गून्हा दाखल करण्यात आला आहे.
         शहरातील अपनयन मुलगी वय- १४ वर्ष ०७ महिने रा. धानकावाडा ता. तळोदा जि. नंदुरबार, यातील संशयीत  मजकुर याने फिर्यादीची मुलगी हिस यातील संशयित आरोपी याने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सपोनि केदार करीत आहेत.