तळोदा दि १९( प्रतिनिधी)
तळोदा वनक्षेत्रातील राजविहीर परिमंडळातील अमोनी नियत क्षेत्रात मौजे धवळीविहीर गावाजवळ रायसिंग वांगऱ्या पावरा यांच्या खासगी शेत जमिनीत दि १६ रोजी रात्री 8 वाजता एक बिबट मृत अवस्थेत आढळून आला.सदर मृत बिबट प्राण्याचे शवविछेदन डॉ. विश्वास नवले, पशु वैद्यकीय अधिकारी तळोदा यांनी दिनांक १७ रोजी सकाळी ८/४५ वाजता केले. मृत बिबट प्राण्याची खालीलप्रमाणे वैशिष्ट्य आढळून आली.लिंग : नर वय : ६ महिने
दात सर्व सुस्थितीत चारही पायाचे पंजे व नखे सुस्थितीत कातडी पूर्ण सुस्थितीत पोट / जठर - पूर्ण पणे रिकामे मृत्युंचे कारण - भूक व उपासमारी तरी सदर प्रकरणी वन गुन्हा नोंदविण्यात आलेला असून शवविच्छेदन नंतर मृत बिबट प्राण्यावर तळोदा आगार येथे जाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत बिबट प्राण्याची राख आग थंड झाल्या नंतर तळोदा शहरापासून 2 किमी अंतरावर असणाऱ्या तापी नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जित केली.तळोदा येथील वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरेवनपाल वासू माळी
वनरक्षक जान्या पाडवी, गिरधन पावरा, विरसिंग पावरा उपस्थित होते. दरम्यान सदर मृतविभट च्या वैद्यकीय तपासणीमध्ये शुभविच्छेदनानंतर त्याला निमोनिया झाल्याचे दिसून येत आहे असे वन विभागाकडून सांगण्यात आले