मागील 2 दशकापासून डी. डी.साळुंके हे श्री. आप्पासो.आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता.जि.नंदुरबार विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच नंदूरबार जिल्हा मूख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष असून संघटनेत त्यांचे भरीव काम आहे.सामाजिक, शैक्षणिक,राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण,वृक्ष लागवड व संवर्धन,आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यंदाचा सन 2022-23 महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून एकमेव अभिनंदनीय निवड करण्यात आली.
यापूर्वी त्यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघ राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार सन - 2008, महात्मा गांधी मिशन ज्ञानप्रसार केंद्र,बीड सन - 2008,ज्ञान विज्ञान,शैक्षणिक संशोधन व विकास केंद्र,पुणे सन -2009,कुणबी पाटील युवा मंच सन - 2010,जनगणना आयुक्त कार्यालय गृह मंत्रालय,भारत सरकार सन -2011,साधना वाचन संस्कृती अभियान,पुणे सन -2012,राज्यस्तरीय पर्यावरण परीषद,निसर्ग मित्र पुरस्कार सन-2016,शालेय शिक्षण विभाग प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सन-2017,सलाम फाउंडेशन मुंबई सन-2017,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार सन- 2017 व 2019,रोटरी क्लब ऑफ,नंदनगरी सन-2019,नवनिर्माण सर्व समाज हिताय संस्था सन-2020, राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य सन-2022 इ.पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिनेश साळुंके हे माजी वनपाल दिलीप साळुंके यांचे चिरंजीव असून मुळगाव शेवाळी ता.साक्री ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.तसेच संस्थेचे राजेंद्र देवरे विखरण, नाशिंदा, खापरखेडा, बोराळा गावातील ग्रामस्थांनी व श्री. आप्पासो. आ.ध.देवरे विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नंदूरबार जिल्हा मूख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मूकेश पाटील, कार्याध्यक्ष कूंदन पाटील,सचिव रघुवंशी,उपाध्यक्ष निमेश सूर्यवंशी, जयदेवभाई पाटील,आदिंनी अभिनंदन केले आहे.