Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदुरबार पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच घेताना एसीबीच्या ताब्यात

नंदुरबार पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच घेताना एसीबीच्या ताब्यात 
नंदूरबार दि १९(प्रतिनिधी)
       नंदुरबार पंचायत समितीच्या कृषी विभागातील विस्तार अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष अटक करण्यात लाच लूचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांना यश आले आहे.
            याबाबत प्राप्त माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील तक्रारदार रनाळे खुर्द गावातील यांच्याकडून नंदुरबार शिवारातील शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मंजुरीच्या प्रस्ताव मंजूर करून तक्रारदार यांना मिळवून देण्याकरिता लोकसेवक विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे व वय 53 यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून पंचायत समितीच्या कार्यालय बाहेरील चहाच्या टपरीवर पंच, साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारल्याने सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
माधव रेड्डी सर., अपर पोलीस मा.श्री.म अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
       श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान महादू वाघ पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार , सापळा कार्यवाही व मदत पथकतील पोहवा विजय ठाकरे, पोहवा विलास पाटील, पोहवा ज्योती पाटील, पोना संदीप नावाडेकर, पोना देवराम गावित, पोनामनोज अहिरे, पोना अमोल मराठे व चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केले आहे.