तळोदा दि २०(प्रतिनिधी)
शहरात मीटर धारकांच्या अनेक तक्रारी येत असून रीडिंग वेळेत व अचूक घेण्यात यावी, याबाबतचे निवेदन शाखा अभियंता तिरूपती पाटील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तळोदा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुका ह्या सामान्य मीटर धारकांना आर्थिक भुर्दंड देणाऱ्या आहेत. अशा अनेक तक्रारी आमच्याकडे तोंडी स्वरुपात प्राप्त झाल्या आहेत. मीटर रीडिंग घेणारा अंदाजे रीडिंग नोंदवतो प्रतेक्ष मीटर वरील रीडिंग व बिलातील रीडिंग मध्ये तफावत आहे महिना पूर्ण होवून काहीदिवस लोटल्यावर रीडिंग घेतले जाते करिता मीटर धारकांचा दर हा बदलतो व दुप्पट बिल सामान्य ग्राहकाला भरावे लागते. तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल.
महावितरण तळोदा उपविभाग कार्यालय उपकार्यकरी अभियंता तिरुपती तुकाराम पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष विपुल राणे ,शहराध्यक्ष सुधाकर माळी, शहर उपाध्यक्ष किरण माळी,तालुका सचिव विवेकानंद महाले, मोरवड गटअध्यक्ष मोग्या पाडवी पुष्पेंद्र मराठे,शुभम माळी, जगदीश बच्छाव, मयूर महाले आदी उपस्थित होते.