Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदिवासींना भरतीय संविधान अनुसूची 5 अनुसूची 6 चा लाभ द्या - प्रकाश गेडाम भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश सरचिटणीस

दि १८ जून सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क
भरतीय संविधान अनुसूची 5 अनुसूची 6 चा लाभ देशातील सर्व आदिवासींना द्या या स्वर्गीय बाबुराव मडवी यांच्या मागणीला अजूनही न्याय मिळाली नाही - प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस         
स्व.बाबुरावजी मडावी यांचा 20 वा स्म्रूतीदिवस कार्यक्रम गडचिरोलीत संपन्न 
          गडचिरोली जिल्ह्याची शिल्पकार लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय बाबुरावजी मडावी यांनी विधानसभे मध्ये भारतीय संविधानातील अनुसूची 5 अनुसूची 6 चा लाभ देशातील सर्व आदिवासींना मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती मात्र आजपर्यंत न्याय मिळाला नाही. आज 2011 च्या जनगणनेप्रमाणे 10 करोड 48 लाख आदिवासी पैकी 8 करोड 49 लाख आदिवासींनाच अनुसूची 5 आणि 6 चे लाभ मिळतो जवडपास 2 करोड आदिवासी जम्मू कश्मीर च्या आदिवासी सह या न्यायापासुन वंचित आहेत. स्वर्गीय बाबुरावजी मडावी यांनी पाहिलेले स्वप्न अजूनही अपूर्ण आहे  असे मत भाजपा  अनूसुचित जमाती मोर्चाचे  प्रदेश संघटन सरचिटणीस तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण दलित मित्र, महाराष्ट्र राज्य प्रकाश गेडाम यांनी व्यक्त केले                                       
               गडचिरोली जंगल कामगार च्या कार्यालयात स्वर्गीय बाबुरावजी मडावी यांच्या 20 व्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते, मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. खा. मारोतरावजी कोवासे होते. उद्घाटक म्हणून डॉक्टर नामदेव जी कीरसान होते.
         यावेळी माजी आ. डॉ.नामदेवराव उसेंडी, आदिवासी विकास परिषद विदर्भ उपाध्यक्ष श्री घनश्याम जी मडावी, मा. सभापती मारोतरावजी ईचोडकर, काँग्रेसचे विदर्भ सचिव उत्तमराव गेडाम, गुलाबजी मळावी श्री कैलास मडावी, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस  ताराम, इंजि.कंगाली ,मुकुंद मेश्राम, निवास कोडाप, अमरसींग गेडाम, डॉ मेश्राम,
मा.सभापती वर्षीताई शेडमाके, सौ.सुनीताताई मडावी, श्रीमती कोडापे, श्री. आलाम जी,श्री येरमे .वनीशामजी येरमे.श्री. मडावी सर.श्री. पेंदाम जी,श्री सुखदेव शेडमाके,प्रामुख्याने उपस्थित होते. या स्मृती दिवस कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातील बहुसंख्य समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते