Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची आदिवासी आयुक्तां सोबत विद्यार्थ्यांच्या पंडित दीनदयाळ योजना, डी बी टी वसतिगृह संदर्भात मीटिंग संपन्न

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि१८          
             अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची आदिवासी आयुक्तां सोबत विद्यार्थ्यांच्या पंडित दीनदयाळ योजना, डी बी टी वसतिगृह संदर्भात मीटिंग संपन्न

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांची आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नयना गुंडे मॅडम यांनी नियोजित असलेली मीटिंग सकारात्मक पार पडली त्यात बारा मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. 
                शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची वाढलेल्या महागाईमुळे डी बी टी 7 हजार ते 8 हजार रुपयेने वाढ करण्यात यावी व 3 महिने अगोदर डी बी टी  मिळावी अन्यथा डी बी टी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागु असलेली पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेत वाढलेल्या महागाईमुळे 10 हजार ते 12 हजार रुपयेने वाढ करण्यात यावी,दोन वर्षापासुन काही विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळालेला नाही तो लाभ सरसकट  तात्काळ मिळावा,वसतिगृह डी बि टी चा लाभ विद्यार्थ्यांना वेळेवर मिळालेला नही तो सरसकट तात्काळ मिळावा,जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वाढीव वस्तीगृह सुरू करून क्षमता 500 मुलांची व क्षमता 300 मुलीचि प्रवेश सन्ख्या वाढविण्यात यावी,तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वाढीव वसतिगृह सुरू करून क्षमता 300 मुलांची व क्षमता 200 मुलींची प्रवेश संख्या वाढविण्यात यावी,दरवर्षी फक्त पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मर्यादित 20 हजार विद्यार्थ्यांना मिळतो तर ती मर्यादा रद्द करून शिक्षणापासून वंचित राहणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा,पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ फक्त शहराकरिता शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मिळत असून तो पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ तालुका स्तरावर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मिळावा,नर्सिंगचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ घेताना कॅप राऊंड ची अट रद्द करून विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळावा,शासकीय वसतीगृहात प्रवेश घेताना अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे,शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष संपुनही शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना कॉलेज कडून मोठ्या प्रमाणात मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश झाल्यावर एक महिन्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  मिळावी,विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ योजनेचे पैसे कमी जास्त मिळाले आहेत ते तपासून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण पैसे द्यावे.
             यासर्व विषयां संदर्भात चर्चा झाली सोमवार पर्यन्त शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे व मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी फोन द्वारे चर्चा झाली 10 ते 15 दिवसात सर्व समस्या सोडविण्यात येतील जर या सर्व समस्या सुटल्या नाही तर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित साहेब यांच्या मुंबई येथील शासकीय बंगल्यावर तीव्र  आंदोलन करण्यात येईल असे आदेश देण्यात आले 
 तरी सोमवार दि 19 जून 2023 रोजी आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक येथील आंदोलन रद्द करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी