अक्कलकुवा दि १६(प्रतिनिधी) मोलगी येथील मोलगी तालुका निर्मिती सह विविध दुर्लक्षित समस्यांच्या मागणीसाठी ८ जून पासून रामसिंग वळवी यांनी उदय भारत सेवा समितीच्या माध्यमातून उपविभागीय अभियंता सा.बा.उपविभाग मोलगी यांच्या कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू होते पण त्यातील बऱ्याच समस्यांवर अधिकाऱ्यानी वेळोवेळी भेट देऊन मागण्यांवर लेखी आश्वासने दिल्याने हे उपोषण आठव्या दिवशी मागे घेण्यात आले.
मोलगी परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि दुर्लक्षित समस्याच्या मागाणीसाठी उदय भारत सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील लोकांनी उपोषणाचा मार्ग निवडला होता त्यातील लोकांच्या प्रमुख मागण्या मोलगी तालुका निर्मिती,नर्मदा काठावरील शाळा विस्थापन,खेडोपाड्यातील विजेचा प्रश्न सोडविणे,तळोदा प्रकल्प कार्यालयाचे उप कार्यालय मोलगी येथे सुरु करणे,मोलगी परिसरासाठी नायब तहसीलदार व गटविकास अधिकारी पद मंजूर करणे,मोलगी येथे दुसऱ्या राष्ट्रीय कृत बँकेची मागणी.मोलगी येथील ग्रामिण रुग्णालयाला जिल्हा उप रुग्णालयाचा दर्जा देऊन आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे,परिसरातील महसुली गावांचे सीमांकन करणे,परिसरातील प्रधान मंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरवस्था,ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करणे,डोंगराळ भागातील सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी,ग्रामसेवक, वनरक्षक,आरोग्य रक्षक,कृषी सहाय्यक यांनी आपल्या सजेच्या ठिकाणी राहून लोकांना सेवा देणे.अशा मागण्या असून वन विभागातील मागण्या वगळता सर्व मागण्यांसाठी लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
मोलगी येथे सुरू असलेल्या उपोषणाला स्थगित करण्यासाठी अककलकुवा तहसिलदार रामजी राठोड,भाजपाचे विधानसभा प्रमुख नागेश पाडवी,यांनी प्रयत्न केले असून यावेळी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष किरेसिग वसावे, प्रकाश सोलकी,सरपंच रोशन पाडवी,जहागीर वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडण्यात आले .
ज्ञमोलगी परिसरातील रस्त्यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणात रामसिग दुदल्या वळवी यांच्या सह माजी सभापती रूषाबाई वळवी,बामण्या हुण्या वळवी डेब्रामाळ,बटेसिग सुण्या वळवी,दिनेश माकत्या पाडवी पलासखोब्रा,बारदा चाद्या वळवी, यांनी उपोषण सुरू केले होते.त्यांना मदत सुरेश वसावे,दिलीप वसावे,सरदारसिंग वसावे,ब्रिजलाल पाडवी,संपत वळवी,सुपर बागुल,यांनी केली.
मागण्या पैकी डेब्रामाळ रस्ता,वेलखेडी,साबंर,पलासखोब्रा रस्ता,वडफळी अरेढी रस्त्याची गुरूवार पासुन दुरूस्ती ला सुरवातभगदरी, कंजाला,डनेल रस्त्यांची शुक्रवार पासुन दुरूस्ती ला सुरवात होईल.एस टी बस सेवा मोजापाडा व वडफळी पर्यंत सुरू करण्यासह २० जुन रोजी उर्वरित रस्त्याच्या मिनी बस सर्वेक्षण करून मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
१८ जुलै पर्यंत मागण्या संदर्भातील विषयसाठी संबधित अधिका-यांची आढावा बैठक तहसिल कार्यालयात आयोजीत करण्यासंदर्भात रामसिग वळवी यांनी अककलकुवा तहसिलदार यांच्याकडे मागणी केली असता तहसिलदार यांनी तोंडी आश्वासन यावेळी दिले
रामसिग दुदल्या वळवी
आमरण उपोषण कर्ता