भाजप महिला मोर्चाच्या वतीने आधार विश्व फाउंडेशनच्या महिलांचा सन्मान
मोदी-9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत उपक्रम
गडचिरोली दि. 14 (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मोदी-9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत सामाजिक संस्था, अंगणवाडी केंद्र व अन्य संस्था द्वारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातही विविध संस्था व अंगणवाडी केंद्राद्वारे महिलांना चांगली सेवा देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 13 जून रोजी गडचिरोली येथील आधार विश्व फाउंडेशनच्या महिला सदस्यांचा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात सत्कार करण्यात आला.
यावेळी आधार विश्व फाउंडेशन च्या अध्यक्ष गीताताई हिंगे ,सचिव सुनीता साळवे , उपाध्यक्ष विनाताई जम्बेवार, सदस्य विजया मने, कांचन चौधरी धनश्री तुकदेव व महिला सदस्यांचा जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे, जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महिला आघाडीच्या गडचिरोली शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसाकडे शहर सचिव पूनम हेमके, नीताताई बैस आधार विश्व फाउंडेशनच्या सदस्य प्रिती मेश्राम, प्रिया निशाणे, साधना कंदोटीवार, लता बेहरे, अंजली देशमुख, सुनीता आलेवार, सीमा कन्नमवार उपस्थित होत्या.