येथील सचिन विजय देसरडा यांना नुकतीच पदार्थविज्ञान विषयात पीएचडी प्राप्त
June 14, 2023
तळोदा दि १४(प्रतिनिधी) येथील सचिन विजय देसरडा यांना नुकतीच पदार्थविज्ञान या विषयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (SPPU) विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. डॉक्टर सचिन देसरडा यांनी थिन फिल्म सोलर सेल ची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याचे संशोधन प्रायोगिक आणि कॉम्प्युटर सिमुलेशन वापरून शोधनिबंध जागतिक पर्यावरण दिन ५-६-२०२३ रोजी वरिष्ठ प्राध्यापक U. P. Singh आणि ६० विद्यार्थ्यांसमोर सादर केला. त्यांना भौतिकशास्त्र विभागाचे SPPU चे प्राध्यापक N. B. Chaure यांचे मार्गदर्शन लाभले.