नंदुरबार (प्रतिनिधी) वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक जगतज्योती, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शूक्रवार दि. 16 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, समस्त वीरशैव लिंगायत गवळी समाज आणि महात्मा बसवेश्वर पुतळा समिती
निगडी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला आहे. शुक्रवार 16 जुन रोजी दुपारी 3:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होईल.यावेळी विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत.सदर सोहळा महात्मा बसवेश्वर चौक, भक्ती शक्ती ते अप्पू घर रस्ता,निगडी प्राधिकरण,पुणे या ठिकाणी होईल.पुण्यासह महाराष्ट्रातील लिंगायत गवळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुतळा समितीचे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नारायणराव बहिरवाडे तसेच महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले आहे.