Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेत (नीट)विराज जैन नंदूरबार जिल्ह्यात प्रथम

वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेत (नीट)विराज जैन नंदूरबार जिल्ह्यात प्रथम
 नंदुरबार (प्रतिनिधी) येथील सुप्रसिध्द रेडिओलॉजिस्ट महावीर सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ.धर्मेंद्र जैन यांचे सुपुत्र विराज जैन याने देशपातळीवर होणाऱ्या नीट परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
विराज जैन याने 720 पैकी 695 गुण मिळवून 99.97 टक्के प्राप्त केले आहेत. नंदुरबार जिल्हातून सर्व प्रथम आणि संपूर्ण भारतातून 494 रँकने विराज जैन याने यश प्राप्त केले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात माता पित्यांचा वारसा पुढे चालवत नंदुरबार जिल्ह्यात सेवा देण्याचा मानस विराज जैन यांनी व्यक्त केला. या यशामागील श्रेय विराज जैन याने आई सौ. सीमा जैन आणि वडील डॉ. धर्मेंद्र जैन तसेच शिक्षक वृंद यांना दिले आहे.