पैश्यांची हरवलेली बॅग शिवसेना व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मदतीने मूळ मालकास परत
June 14, 2023
तळोदा दि १४(प्रतिनिधी) दिनांक 13 जुन 2023 रोजी तळोदा शहरातील हनुमान मंदिर समोर भटू कासार ह्यांचे दुकान आहे रात्रीच्या वेळी दुकान बंद करून पैश्याची पिशवी ही बाजुच्या ओट्यावर ठेऊन भटू कासार हे जवळच उभी असलेल्या सोड्याच्या लॉरी वर गप्पा करत होते. तेव्हा त्याचा लक्षातून निघुन गेले की पैश्याची पिशवी आपण बाजूच्या ओट्यावर ठेवली आहे. त्या नंतर तेथे एक अनोळखी व्यक्ती 8 ते आठ 30 च्या दरम्यान त्या ओट्यावर आला. व ती पैश्याची पिशवी घेऊन निघून गेला. त्या घटनेची माहिती त्या दुकानदाराने शिव सेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार यांना दूरध्वनी वरून दिली व त्या नंतर आनंद सोनर व जितू दुबे हे घटनास्थळी गेले सर्व परिसरात असलेल्या सीसीटीव्ही तपासले परंतु चित्र अस्पष्ट दिसत असल्याने दोघानी सर्व शिवसेनेच्या व मित्र परिवारास सदर व्हिडीओ टाकून माहिती घेण्यासाठी सांगितले तेव्हा काही व्यक्तींनी ह्या व्हिडिओत दिसणारा व्यक्ती हा अमुक असू शकतो असे सांगितले तेव्हा आनंद सोनार ,जितेंद्र दुबे, सुरज माळी, कल्पेश माळी, विजय मराठे हे त्या व्यक्ती कडे गेले व विचारपूस केली असता त्या व्यक्तीने बॅग माझ्या जवळ असल्याचे सांगितले व त्यात असलेली रक्कम ही जशीच्या तशी सुपूर्द केली व ती आम्ही भटू कासार भांडे दुकानदार यांना परत केली त्यात असलेली 45670 रुपये हे बरोबर आहे असे दुकानदार ह्यांनी सांगितले व आभार व्यक्त केलं.पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापा-यांनी एक कॅमेरा रोड फेसवर लावल्याने सदर घटना उघड होण्यास मदत झाली आहे.