Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ ,तीन राज्यीय ३४ वे अधिवेशनात समाजातील शैक्षणिक,यूवक यूवती दिशा आणि दशा,रूढी परंपरा, ध्येय धोरणांवर चर्चा व,गूणवंत,यशवंतांचा गूणगौरव

तळोदा दि १४ (प्रतिनिधी)
          क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, मध्यप्रदेश गुजरात,तीन राज्यीय  ३४ व्या अधिवेशनात समाजातील शैक्षणिक,यूवक यूवती दिशा आणि दशा,रूढी परंपरा, ध्येय धोरणांवर चर्चा व,गूणवंत,यश निवड झालेल्यांचा गूणगौरव, करण्यात आला.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रा.आत्माराम गंभीर होते.
                      सभेच्या सुरुवातीला अजेंडा वरील विषयानुसार मागील सभेचे इतिवृत्त वाचन  कायम करण्यात आले. प्रसंगी समाजातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.  यांत कु. सायली नितीन महाजन (चोपडा), कु. योजना कल्पेश माळी (तळोदा), चि. सांकेत उमेश सागर (तळोदा), कु. किंजल अनिल माळी, कु. सायली प्रवीण माळी, कृतिका प्रवीण माळी ( कळवा), ओम लहू माळी, यशस्वी सुरेंद्र महाजन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील पीएचडी धारक तसेच एम.पीएससीच्या माध्यमातून न्यायाधिश पदाची परिक्षा उत्तीर्ण झालेले आनंदराव आत्माराम महाजन यांच्या विशेष सत्कार करण्यात आला.
           तसेच पुढील विषयानुसार क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातची घटना दुरुस्ती, बदल, वाढ, घट करणे, तसेच संस्थेच्या पत्ता बदलणे या संदर्भात चर्चा करण्यात आली. या विषयानुसार कार्यकारी मंडळाचे सदस्य पी जी चौधरी सर, मनोहर महाजन, दिनेश शेलकर, अनिल माळी, तुकाराम महाजन यांनी सुधारणा मंडळाच्या घटने संदर्भात अभ्यासपूर्ण मत मांडले त्यात मंडळाची घटना ही मंडळाच्या विकासासाठी व उन्नतीसाठी सुयोग्य असून त्यात बदल करण्याची सद्या आवश्यकता नाही असे सांगितले. सामाजिक प्रबोधन व अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यावर आपले सामाजिक विचार मांडताना सुमनबाई महाजन ( तामसवाडी) यांनी समाजातील वाढती युवकांची व्यसनाधीनता, तसेच मुले ,मुली पळुन जाण्याचे प्रमाण याकडे समाजाचे लक्ष वेधले तसेच सासू-सासरे विरहित नवरे पाहिजेत अशी मुलींची मानसिकता होत आहे यासाठी मंडळांनी समाज प्रबोधनपर शिबिरे घ्यावी असे सांगितले. चेतन महाजन ( चहार्डी ) यांनी युवकांसाठी आदर्श ठरतील असे व्यक्तिमत्व सध्या समाजात निर्माण होत नाही, यासाठी समाजाने कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे विवेचन केले. क्षत्रिय माळी समाज मंडळ तळोद्याचे माजी अध्यक्ष ईश्वरलाल मगरे सर यांनी वेळ खाऊ सामाजिक प्रथा बंद करण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना तळोदा समाज पंचाने प्रबोधन पर मेळावा घेतला व त्यात तळोदा येथील अनेक अनिष्ट चालीरीती, परंपरा तसेच वेळ खाऊ प्रथा बंद केल्या व त्याचे परिपत्रक प्रत्येक घरामध्ये पोचविले याचे उदाहरण दिले तर माळी भूषण चे संपादक भीमराव महाजन यांनी जळगाव येथे माळी समाज सुधारणा मंडळाचे वस्तीगृह सुव्यवस्थीत सुरु आहे याचं वस्तीगृहाच्या धर्तीवर क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळाने नाशिक पणे, मंबई येथे
             समाजातील शैक्षणिक उद्दिष्टासाठी तसेच नोकरी निमित्त गेलेल्या समाज बांधासाठी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून वस्तीगृह निर्माण करण्याचे धोरण मंडळाने तयार करावे असे सूचित केले तर महेंद्र महाजन ( किनगाव ) यांनी विवाह वय व मुलींच्या अपेक्षा याकडे लक्ष वेधले तर पुणे माळी समाज पंच मंडळाचे कार्यकारणी सदस्य दीपक मोतीलाल मगरे यांनी शैक्षणिक व नोकरी निमित्त आलेल्या समाज बांधवांसाठी तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले तर माळी समाज सुधारणा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रा. प्रकाश माळी यांनी नोकरी व व्यवसाय निमित्त आलेल्या समाज बांधवांसाठी मुंबई माळी समाज मंडळाचे कार्यालय उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले यावेळी मंडळाचे सहसचिव योगेश भीमराव महाजन , पुंडलिक गंभीर चौधरी, भास्कर सुखदेव माळी, अनिल पुंडलिक माळी, सुरेश संतोष चव्हाण, हिरालाल ओंकार महाजन, दगडू भगवान महाजन, मनोहर भगवान महाजन, दीपक मोतीलाल महाजन, नितीन शंकर सोनवणे, संजय संतोष महाजन, नरेश लक्ष्मण महाजन, भिकन दागा महाजन, संजय गंगाराम महाजन, नथ्थू गंगाराम महाजन, सौ. रत्ना दंगल माळी, सौ. चित्रा कैलास माळी या कार्यकारी सदस्यांसह स्वीकृत सदस्य व महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या तसेच अधिवेशनाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव किशोर राजकुळे सर तसेच संजय गंगाराम महाजन सर यांनी केले.