Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोदी @9अंतर्गत नंदूरबार येथे लाभार्थी संमेलन संपन्न

नंदुरबार दि २२(प्रतिनिधी)
     मोदी @9 अभियानानिमित्त नंदुरबार लोकसभा येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर नंदुरबार येथे आयोजित लाभार्थी संमेलन. याप्रसंगी भाजपा राष्ट्रीय महामंत्री मा.कैलासजी विजयवर्गीय,  मा.खा.विनयजी तेंडुलकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री  विजय भाऊ चौधरी, आदिवासी विकास मंत्री मा.ना.डॉ. विजयकुमार गावित, खा.डॉ.हिनाताई गावित, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित, आ.जयकुमार रावल आ.राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे आदि मान्यवर उपस्थित होते.
     याप्रसंगी संमेलनाला संबोधित करताना राष्ट्रीय महामंत्री  कैलासजी विजय वर्गीय यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र देत 9 वर्षाच्या कार्यकाळात सेवा, सुशासन व गरीब कल्याण याचा संगम विविध कामातून देशाने प्रगती केली आहे. जनधन खात्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना संपूर्ण पैसा त्याला मिळत आहे. त्यामुळे दलालीला चाप बसला आहे. मोदी सरकारची निती व नियत साफ असल्यानेच अनेक विकास कामे होऊ शकले. सर्व गरिबांना 2024 पर्यंत पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येणार आहे. इंडिया स्टार्टअप च्या माध्यमातून आतापर्यंत 43 हजार 800 करोड ची मदत करण्यात आली असून 9 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मागील निवडणुकीत दिलेले वचन राम मंदिर, 307 हटवणे आदी वचननामांची पुर्तता केली असून 2024 पर्यंत सर्व वचननामांची पूर्ती करण्यात येणार असल्याचे सांगत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची पताका जगभरात पसरली असून जगात भारतीयांना सन्मान मिळत आहे.व भाजप प्रदेश महामंत्री  विजय भाऊ चौधरी यांनी गत नऊ वर्षांच्या मोदी सरकारचा काळातील समाजाचा सर्वांगीण विकासासाठी केलेली कामे यांचा आढावा घेण्यात आला.यावेळी लाभार्थी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.