Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी साहित्य, संस्कृती, जतन, संवर्धन व संशोधन केंद्र उभारण्यात यावे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्तांना निवेदन

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि२२
            नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी साहित्य, संस्कृती, जतन, संवर्धन व संशोधन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी जिल्हयातील आदिवासी कवि, साहित्यिक संतोष पावरा यांनी पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयुक्त राजेंद्र भारुड यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
         सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून परिचित आहे. अजूनही जिल्ह्यात आदिवासीची पारंपरिक मूळ संस्कृती, मौखिक साहित्य परंपरा लोकांनी जपून ठेवली आहे. आदिवासी संस्कृत प्रेम, विश्वास, समता, बंधुता लोकशाही स्वातंत्र्य व सहकार्य अशी मूल्ये आहेत. आदिवासी परंपरेत निसर्ग जतन, संवर्धनासंदर्भात नियम परंतू आज आधुनिक काळात जग बदलत आहे. त्या प्रवाहात आदिवासी साहित्य, संस्कृती इतिहासाला अधिक धोका असल्याने जिल्ह्यात आदिवासी साहित्य संस्कृती संवर्धन करण्यासाठी संशोधन केंद्र वेळीच उभारणे आवश्यक आहे. आदिवासी विकास मंत्री व शासनाने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी कवि संतोष पावरा, रामदास पावरा, सागर पावरा, कल्पना पावरा, सुभाष मोरे, निती मोरे, गणेश खर्डे, राहुल पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.