तळोदा दि ४(प्रतिनिधी)सामाजिक वनीकरण विभाग तळोदातर्फे लाइफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट उपक्रम
रांझणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक पाच जून 2023 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्र सरकारकडून लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट अंतर्गत उपक्रम राबवण्याचे निर्देशित केले आहे.
याअंतर्गत तळोदा तालुक्यातील रांझणी ग्रामपंचायत आवारात सामाजिक वनीकरण विभाग तळोदातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वनरक्षक श्रीमती दीपिका अहिरे यांनी पर्यावरणपूरक प्रतिज्ञेचे सामूहिकरीत्या वाचन करून पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच स्वच्छतेचे महत्त्व,पाण्याचे महत्व ,प्लास्टिक वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले ,जवळच्या ठिकाणी जायचे असल्यास खाजगी वाहनांचा वापर न करता सरकारी वाहनांचा वापर करावा ,सीएफएल ब्लब वापरणे सुका कचरा ओला कचरा याची योग्य विल्हेवाट लावणे, कंपोस्ट खत तयार करणे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच रोपांचे वाटप करण्यात आले .त्याचबरोबर वटपौर्णिमेचे औचित्य साधून तळोदा येथील कनकेश्वर मंदिरात वटपूजेसाठी आलेल्या महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास रांझणीचे सरपंच अजय ठाकरे ,उपसरपंच शरद मराठे ,लिंबा मराठे,सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्रीमती एल के अहिरे, वनरक्षक दीपिका अहिरे ,वनमजूर जी. डी.शिंपी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.