Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आ.बच्चू कडु यांनी आपल्या मतदार संघातील १५०२ यूवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.यूवकांत समाधान

आ.बच्चू कडु यांनी मतदार संघातील १५०२ यूवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
चांदूरबाजार दि ४(प्रतिनिधी) 
            प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तसेच आमदार बच्चू  कडू त्यांच्या राजकीय प्रवासात ते आपल्या मतदारसंघात विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत .सोयी सुविधांपासून मतदारांना, पाल्यांना रोजगार मिळावा यासाठी एक विजन घेऊन काम करतात.
         एकाच ठिकाणी ५९ कंपन्यांना एकाच, जागेवर कार्यक्रमाचे आयोजन करून नोकरीची संधी मतदारसंघातील युवक युवतींना  संधी उपलब्ध करुन देण्यासाठी, "भव्य रोजगार मेळाव्याचे अचलपुर व चांदुरबाजार" येथे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास महाराष्ट्रातील नामांकित ५९ कंपन्यांनी हजेरी दर्शवली. रोजगारासाठी १५०२ युवकांची निवड या ठिकाणी करण्यात आली.
             नूकतेच दिव्यांग कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुमारे 30 लाख दिव्यांगांना भेडसावणारी आव्हाने ओळखून, जे अनेकदा सरकारी मदत मिळवण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघर्ष करतात, महाराष्ट्र सरकारने "दिव्यांग कल्याण दिव्यांगांच्या दारात" मंत्रालय" अभियान सुरू केले आहे. .  या उपक्रमाचा उद्देश प्रभावी आधार प्रदान करणे आणि शारीरिक अपंग व्यक्तींच्या तक्रारींचे निराकरण करणे हा आहे.