तळोदा दि ४(प्रतिनिधी) तळोदा-अक्क्लकूवा तालुक्यात अचानक आलेल्या वादळी पावसाने रामजी हाँटेल खापर जवळ रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. जवळअनेकांचे घरे, छप्पर,झाडे उन्मळून पडली चिनोदा येथे कार वर झाड कोसळले कआलईबएल,अमोनी,त-हाडी,बोरद,अनेकांचे नूकसान झाले आहे.
सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे बाजारात,शेतात, गेलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले असून आदिवासी कुटुंबातील घरांचे मोठे नुकसान झाला आहे.
गुजरात राज्यमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे सातपुडा पायथ्यालगत वादळी वारे आणि हलका पाऊस पुढील काही तासात पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि जोरदार वादळ वारा सुरू झाला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण व जोरदार वारा सुरू होता. तालुका परिसरात जोरदार अवकाळी पावसाचे आगमन झाले.
जोरदार वारा असल्यामुळे घरांचे पत्रे हवेत उडाले. यामुळे अनेक नागरिक बालंबाल वाचले असून अनेक झाडेही रस्त्यावर कोसळल्याने मोटरसायकलीचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यामुळे तालुक्यातील ढेकाटी,
त-हाडी,बोरद गावात घराची पडझड झाल्याचे वृत्त आहे. नागरिकांची देखील धावपळ उडाली आहे.