Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नर्मदा जीवन शाळां मणिबेली च्या सात खोल्यांचे पत्रे उडाले आहेत.नर्मदा काठावर चक्रीवादळाचा धूमाकूळ घातल्याने चिमलखेडी,थूवानी,भादल, येथे नूकसान

सातपुडा मिरर....,
नर्मदा जीवन शाळां मणिबेली च्या सात खोल्यांचे पत्रे उडाले आहेत.नर्मदा काठावर चक्रीवादळाने धूमाकूळ घातल्याने चिमलखेडी,थूवानी,भादल, येथे ही नूकसान झाले आहे.काही ग्रामस्थांना इजा झाल्याने त्यांचावर तरंगत्या दवाखान्यात उपचार करण्यात आले आहेत.
            आज दि 4/6/2023 रोजी सातपुडा पर्वताच्या नर्मदा परीसरात 9 ते 10 वाजे दरम्यान चक्रीवादळ आल्याने मोठ्या प्रमाणावर घरांचे व घरातील जिवन अवाशक साहित्याचे नुकसान झाले आहे. चिमलखेडी येथे रायसिंग खालपा वसावे व विपीस रायसिंग वसावे यांची घरे वादळात पुर्णपणे उडून गेल्याने दोन्ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तसेच घरांचे छता आंगवर पडल्यामुळे केमदाबाई खेत्या वसावे रा. चिमलखेडी ही गंभीर जखमी झालेल्या आहे.तिच्यावर करण्यात आला आहे.
    नर्मदा जीवन शाळा मणिबेली चक्रिय वादळामुळे १०.४५ वाजता शाळेचे सात खोलीचे पात्रे  उडाले आहेत.तसेच नर्मदा जीवन शाळा थुवानी ता. धडगाव येथेही चक्री वादळामुळे नुकसान झाले असून पुर्ण नर्मदा काठच्या परीसरात जीवन शाळेंसह अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत माणीबेली ते भादल प्रत्येक गावात नुकसान झाले आहे.चक्रीवादळाचा जोर पाहता डोंगर वस्त्यातील कुडाच्या घरांचे नुकसान झाले आहे.बैल,गाय गोठे, पडवी या ही मोठ्या प्रमाणावर नेस्तनाबूत झाल्याने नूकसान झाले आहे.