अक्कलकुवा दि ५(प्रतिनिधी) हूणाखांब ता अक्कलकुवा येथील उपसरपंच व त्यांच्या सात सहका-यानी आ. आमशा पाडवी यांच्या हस्ते शिवबंधन बांधत उबाठा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आमदार आमश्या दादा पाडावी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन युवा नेते कुणाल जैन यांचे पूर्वाश्रमी चे सहकारी व समर्थक हुणाखाब ग्रामपंचायतचे उपसरपंच, सोबत सात ग्रामपंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी दि ३ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात हूणाखांब येथे जाहिर प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणूकिच्या वेळेस कुणाल जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आता त्यांचे समर्थक व पूर्वाश्रमीचे सहका-यांनी जाहिररित्या प्रवेश केला आहे यावेळी माजी सरपंच कान्हा नाईक , युवा सेनेचे नेते कुणाल जैन, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी,सुधीर ब्राम्हणे , गोलू भैय्या चंडेल, अविनाश बि-हाड़े, संजय ठाकरे, अर्जून पाडवी, अशोक दादा वसावे आदि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.