सातपुडा मिरर न्युज नेटवर्क
दि 2४ जुन
दिंडोरी तालुक्यातील पौर्णिमा गावित एमपीएससी परीक्षेत आदिवासी मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी येथील शिक्षक कन्येने आदिवासी मुलींमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिला क्रमांक मिळविला असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पौर्णिमा गावित हिने एका खेड्या गावातून तिचे यश मिळविले आहे. सप्तशृंगगड पायथ्याशी अहिवंतवाडी किल्ल्याजवळ अहिवंतवाडी गाव आहे. येथील विठोबा शिवराम गावित हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांची कन्या पौर्णिमा गावित ही नवोदय विद्यालयात शिकली. तिने राहुरी येथील कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्री कॅल्चरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर आयआयटी खरगपुर येथे एमएस्सी ॲग्रीकॅल्चरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर एमपीएससी परिक्षा दिली. पौर्णिमा आज पर्यंत तीन वेळेस परिक्षा उत्तीर्ण झाली. 2020 साली ती मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली होती. पण तिने ते नाकारुन पुढे परिक्षा सुरु ठेवल्या. तिसऱ्या प्रयत्नात तिला महानगरपालिकेच्या मुख्य अधिकारीपदी निवड झाली. आदिवासी समाजाच्या मुलीसाठी तिने एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांचा मन लावून अभ्यास केला व ध्येय निश्चित ठेवले तर यश हमखास मिळते, असे पौर्णिमा गावित हिने सांगितले. पौर्णिमा गावित हिचे विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, माजी आमदार धनराज महाले, छत्तीसगड येथील वन विभागाचे असिस्टंट कमांडंट राजू वाघ, दिंडोरी येथील श्री ईशान्येश्वर अभ्यासिकेचे संचालक तथा नगरसेवक नितीन गांगुर्डे आदींनी अभिनंदन केले.ग्रामीण भागातील मुलींचा यशाचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.