तळोदा दि २५(प्रतिनिधी) तळोदा तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री पद्माकर वळवी हे तर प्रमुख अतिथी आ. राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी, संघाचे चेअरमन गोविंद पाटील, व्हा.चेअरमन पुरुषोत्तम चव्हाण व संचालक संजय चौधरी, सुभाष पाटील, नितीन पटेल, प्रकाश माळी, कैलास चौधरी अनिल माळी, चंदू भोई, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील, कांतीलाल भापकर,अरुण मगरे, भरत पाटील, आशाबाई पटेल, सुरेखा सागर, जितेंद्र पाटील, विलास लोखंडे, संजय पटेल आदी उपस्थित होते.
खरेदी विक्री संघ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आमदार राजेश पाडवी,माजी आमदार पद्माकर वळवी, डॉ शशिकांत वाणी,माजी नगराध्यक्ष भरत माळी,माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री अँड पद्माकर वळवी बोलताना म्हणाले की आपल्या भागात हिरारीने निवडणुका झाल्यात त्याची चर्चा जिल्हाभर होत आहे. शेतकरी व नागरिकांना त्याचे श्रेय दिले पाहिजे प्रत्येक निवडणुकीकडे बघण्याच्या दृष्टिकोन हा फार महत्त्वाच्या भाग आहे .सहकार क्षेत्रात ही परंपरा लोकप्रतिनिधींनी कायम ठेवली आहे आता पर्यंतच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी सातत्याने सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे मदत देण्याचे काम केले आहे.या संस्थांमध्ये पक्ष त्यांचे कार्यकर्ते विचार न करता राजकारण केले नाही खरेदी विक्री संघाचा कारभार कै. दत्तूभाई पाटील, कै. परसुभाई पाटील हे नेतृत्वात खरेदी विक्री संघात मोठे योगदान दिले आहे संस्थेचे हित जोपासत त्यांची परंपरा संघाचे चेअरमन गोविंद पाटील हे चांगल्या पद्धतीने चालवत आहे संस्थेची भरभराटीला येईल असे शेवटी सांगितले.
याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी मार्गदर्शन करतांना खरेदी विक्री संघाच्या कारभार गोविंद भाई पाटील हे बऱ्याच वर्षापासून हाताळताहेत सर्व शेतकऱ्यांचे सहकार्य आहे शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघातून रासायनिक खते, बी, बियाणे, वगैरे साहित्य खरेदीस प्राधान्य दिले पाहिजे संघाचे सर्व सुविधायुक्त इमारतीसाठी तसेच गोडाऊन व शेतकरी भवनासाठी शासन स्तरावर निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने माझे नेहमी सहकार्य राहील खरेदी विक्री या संस्थेला अध्यक्ष म्हणून गोविंद पाटील कुशल नेतृत्व भेटले आहे संस्थेची उन्नती व भरभराटीला येईल असा विश्वास व्यक्त केला. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी मदत देईन. असे आमदार पाडवी यांनी आश्वासीत केले.
सहकारी संस्थांना लोकप्रतिधींचे नेहमी सहकार्य राहिले आहे खरेदी विक्री संघाच्या पारदर्शक कारभारात कै दत्तूभाई पटेल, कै पुरुषोत्तम उर्फ परसुभाई पाटील यांच्या नेतृत्वात मोठे योगदान आहे त्यांची परंपरा गोविंद उर्फ विश्वास पाटील हे संघाचा कारभार यशस्वी पद्धतीने हाताळला व पुढेही संस्था हित जोपासतील असा असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला
कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार गुलाबसींग गिरासे यांनी केले