Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सातपुड्याचा अक्कलकुवा तालुक्यातील दूर्गम भागात रस्त्यांचे तीनतेरा,मृत्यूला आमंत्रण देणारे रस्ते,कूणी लक्ष देईल का???

अक्कलकुवा प्रतिनिधी- योगेश्वर बुवा 7057283888
   दुर्गम भागातील प्रवास झाला बिकट,
        रस्त्यांचे वाजले की बारा.
     अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओघाणी ते दहेल दरम्यानच्या मूख्य रस्त्याचे तिनतेरा वाजले असून या रस्त्यावरून वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे.
              अक्कलकुवा तालुका हा सातपुड्याच्या द-या खोऱ्यात वसलेला तालुका असून दरवर्षी बारमाही रस्त्यांसाठी करोडो रुपयांच्या निधी खर्च केला जात असतो. मात्र एक पावसाळा निघाला की रस्ता होता की नाही अशी परिस्थिती निर्माण होत असते. अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओघानी, मोगरा, दहेल या गावादरम्यानच्या रस्त्यांची पूर्ण वाट लागली असून वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. सातपुड्याच्या द-या खोऱ्यातील भाग असल्यामुळे घाटाचे रस्ते आहेत व या घाटाच्या रस्त्यात देखील रस्ताच शिल्लक राहिलेला नाही अशी अवस्था या रस्त्यांची झालेली आहे. दुर्गम अतिदुर्गम भागातील रस्ते तयार करण्यासाठी दरवर्षी करोडो रुपयांच्या निधी शासन स्तरावरून वितरीत केला जातो . यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना यांच्यामार्फत रस्ते तयार केले जात असतात. मात्र रस्ते तयार करत असताना याची गुणवत्ता तपासणी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. करोडो रुपये खर्च करून रस्त्याची कामे केली जातात मात्र काही दिवसानंतरच त्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडतात व जैसे थे परिस्थिती निर्माण होत असते. याला कारणीभूत कोण? संबंधित ठेकेदार की नियंत्रण असणारी यंत्रणा हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. जवळच्या गुजरात राज्यात असलेल्या रस्त्यांची गुणवत्तेच्या तुलनेत या भागात तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता किती खालावलेली आहे हे लक्षात येत असते.
        तरी पावसाळ्याच्या आधी संबंधित रस्त्याची ताबडतोब दुरूस्ती करून नवीन रस्ते तयार करण्यात यावे व जे नवीन रस्ते तयार करण्यात येत आहेत त्या रस्त्यांची देखील गुणवत्ता तपासणी होणे गरजेचे आहे.
   
     (दहेल या गावाजवळ असलेल्या वळणावळणाच्या घाटात तर रस्ताच शिल्लक राहिला नसून रस्त्याचे अवशेष दिसतात, वाहन चालवणे म्हणजे प्रत्यक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे.व अश्या मार्गावरून वाहन धारक प्रवाश्याच्या जिवाशी खेळून वाहने चालवत असतात.तरी त्वरित पावसाळ्यापूर्वी या घाटातील रस्ता दुरुस्त करण्यात यावा.व सदर काम हे दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.)