Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आषाढी एकादशी व बकरी ईद सण एकाच दिवशी येत असल्याने त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा मुस्लिमपंचचा निर्णय

तळोदा दि २५(प्रतिनिधी)  29 जून रोजी आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांची बकरी ईद सण एकाच दिवशी येत असल्याने त्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
                   या पार्श्वभूमीवर दि २४ रोजी मुस्लिम समाजाने जामा मस्जिद गौशिया सिद्दिकीया मस्जिद पंच व ( ट्रस्ट ) समाजाचे प्रतिष्ठित  नागरिकांनी संयुक्त बैठक घेऊन एक   मुखी निर्णय घेण्यात आला ज्या दिवशी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी कुर्बानी न करण्याच्या निर्णय घेण्यात आला त्यात सर्वांनी संमती दर्शवली या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल, पोलीस नाईक अजय पवार, पोलीस नाईक अनिल पाडवी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष आरिफ शेख नुरा, प्रगतशील शेतकरी हाजी निसार मकराणी, याकूब पिंजारी, माजी नगरसेवक अमानुद्दीन शेख, अकील अन्सारी माजी नगरसेवक कलीम अन्सारी, सुलतान अब्दुल गणी, बबलू पिंजारी, पप्पू सय्यद, समीर पिंजारी, सादिक कुरेशी, गफ्फार कुरेशी, रऊफ अन्सारी, मुखतार कुरेशी, पिंजारी समाज अध्यक्ष शकील मन्सुरी, साबीर मिस्तरी, असलम हैदर पिंजारी, नासिर मणियार, नासिर खाटीक, हनीफ मणियार, साबीर पिंजारी,  मुस्ताक अली कालूमिया, रफिक शेख, सादिक सय्यद रसूल मिस्तरी , आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार म्हणाले, की तळोदा शहराची परंपरा शांतता राखण्याची आहे मुस्लिम समाजाने जो निर्णय घेतला त्याच्या अभिनंदन करतो आणि मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय एकात्मतेने जिल्ह्यात नाव होईल याबद्दल शंका नाही या कार्यक्रमात निसार मक्रारानी, आरिफ शेख, नुरा याकूब पिंजारी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.