Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोदीजी जात, धर्म असा भेदभाव न करता सर्वांना विकास योजनेचा लाभ देत आहेत - ना विनोदजी गोटिया

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि २६
       मोदीजी जात, धर्म असा भेदभाव न करता सर्वांना विकास योजनेचा लाभ देत आहेत; मात्र काँग्रेसने ठराविक लोकांचाच विकास केला- ना विनोदजी गोटिया
         देशावर सर्वाधिक सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने केवळ दलालीसाठीच विकास कामे केली विकासाच्या योजना ठराविक लोकांनाच तोंड बघून दिल्या मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशासाठी आणि देशवासीयासाठी काम करीत आहेत त्यांनी जात धर्म असा भेदभाव न करता सर्वांना विविध योजनेचा थेट लाभ दिला असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष ना विनोदजी गोटीया यांनी लातूरच्या लाभार्थी संम्मेलनात बोलताना केले.
        भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध योजनेतील लाभार्थ्यांचे संमेलन लातूर येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालयात झाले. या कार्यक्रमास उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खा तीरतसिंह रावत, मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष विनोदजी गोटिया, भाजपा जनसमर्थन अभियानाचे विभागीय क्लस्टर प्रमुख माजी पालकमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड, खा सुधाकर शृंगारे, अहमदपूर विधानसभा प्रमुख विनायकराव पाटील, उदगीर विधानसभा प्रमुख सुधाकर भालेराव, जिल्हा प्रभारी प्रा किरण पाटील, लोकसभा प्रचार प्रमुख दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार गोविंदाण्णा केंद्रे, बब्रुवान खंदाडे, धर्माजी सोनकवडे, प्रदेश भाजपाचे शैलेश लाहोटी, लातूर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे, निलंगा विधानसभा प्रमुख दगडू साळुंके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्री क्षीरसागर, विक्रमकाका शिंदे, संजय दोरवे, रामचंद्र तिरुके, त्र्यंबकआबा गुट्टे, अमोल पाटील, बापूराव राठोड, सतीश आंबेकर, भागवत सोट, बालाजी गवारे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती या लाभार्थी संमेलनास भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन 99% देशातील जनता मोदीजींच्या विविध योजनेचे लाभार्थी आहेत असे बोलून दाखविले येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी 2024 च्या लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मताधिक्याने विजयी करून मोदीजींना मोठे समर्थन द्यावे असे आव्हान केले.