Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार कुणाल पाटील आयोजित धूळे येथे रोजगार मेळाव्यात ६ हजार २७० जणांना रोजगार मिळाला तरूणांमध्ये उत्साह

आमदार कुणाल पाटील आयोजित धूळे येथे रोजगार मेळाव्यात ६ हजार २७० जणांना रोजगार मिळाला 
धुळे दि ११ (प्रतिनिधी- सतिष पवार) जिल्हयातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तब्बल ८ हजार ७७६ युवक-युवतींनी मुलाखती देऊन सहभाग नोंदविला. त्यापैकी ६ हजार २७० युवक युवतींची निवड होवून त्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळाली. आ.पाटील यांनी आयोजित केलेल्या रोजगाराच्या या महाकुंभामुळे शेकडो हातांना काम मिळाले आहे. दरम्यान जिल्हयातील बेरोजगारी कमी व्हावी म्हणून यापुढे असे उपक्रम नेहमी राबवून युवक-युवतींना शाश्‍वत व खात्रीशीर रोजगार देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.माजी मंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दि.११ जून रोजी धुळ्यातील नॉर्थ पॉईंट स्कूल येथे आ.कुणाल पाटील यांनी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील आणि माईसाो.सौ.लताताई रोहिदास पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले. दरम्यान प्रारंभी माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचा धुळे जिल्हा व शहर काँग्रेस, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ धुळे, श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था,धुळे, जवाहर शिक्षण प्रसारक संस्था,धुळे अशा विविध संस्थाच्यावतीने जाहिर सत्कार करण्यात आला. उद्घाटन समांरभात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी सर्वाधिक रोजगार दिला आहे. आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही जिल्हयातील युवक युवतींना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत आहोत. राज्यात आणि देशात बेरोजगारीचे भयाण चित्र आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील बेरोजगारी कमी व्हावी म्हणून आम्ही हा खारीचा वाटा उचलला आहे. दरम्यान यापुढेही रोजगार मेळाव्याचे उपक्रम नियमित राबवून जिल्ह्यातील युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी युवक युवतींनी शिक्षणाची कास धरुन नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे. कारण मनापासून प्रयत्न करणार्‍याला रोजगार किंवा नोकरीची संधी निश्‍चित असते असे प्रतिपादन शेवटी आ.कुणाल पाटील यांनी केले.
आ.कुणाल पाटील यांनी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी एकूण ८ हजार ७७६ जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एकूण ६ हजार २७० जणांची निवड होऊन रोजगाराची संधी मिळाली आहे. त्यात ३ हजार ८८० जणांची निवड करुन जागेवरच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. तर मुलाखतीच्या पहिल्या फेरीत २ हजार ३९० जणांची निवड झाली आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीमार्फत बोलवून अंतिम मुलाखतीतून निवड केली जाणार आहे.रोजगार मेळाव्यात ज्या युवक युवतींची निवड झाली नाही त्यांना आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टमार्फत मुलाखतीचे तंत्र व व्यक्तीमत्व विकास याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून धुळ्यात पुन्हा एकदा रोजगार मेळावा आयोजित करुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.रोजगार मेळावा सकाळपासून सुरु झाला तेव्हापासून आ.कुणाल पाटील हे मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवांराशी वैयक्तीक भेटून त्यांचा विश्‍वास वाढवित होते. मुलाखतीसाठी आलेल्या युवक-युवतींच्या अडीअडचणी जाणून घेवून त्या स्वयंसेवकांमार्फत सोडवत होते. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आ.कुणाल पाटील हे मुलाखत देण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये रमले होते.विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक युवतींनी मुलाखती दिल्यानंतर कंपन्यांमार्फत लगेच त्यांना नियुक्तीपत्र दिले गेले. अनेक महिन्यापासून बेजोगारीचा सामना करीत असलेल्या तरुणांना नोकरी मिळाल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसांडून वाहत होता.महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,नाशिक यासह विविध कार्पोरेट शहरातील एकूण ७५ नामांकित कंपन्यांनी उपस्थित राहून बेरोजगार मेळाव्यात सहभाग घेतला होता. या कंपन्याच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेवून बेरोजगार युवक-युवतींना त्याच दिवशी लगेच नियुक्ती पत्र देण्यात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली.धुळ्यातील नॉर्थ पॉईंट स्कूल येथे झालेल्या उत्तम नियोजनामुळे बेरोजगार मेळावा पूर्णपणे यशस्वी झाला. त्यामुळे मुलाखतीसाठी आलेल्या युवक-युवतींनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक कंपन्यांच्या प्रतिनिधींना ७५ खोल्यांमध्ये मुलाखतीसाठी व्यवस्था करण्यात आली होती.तर मुलाखती आधी एकूण ३२ नोंदणी कक्ष उभारण्यात आले होते. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी पाण्याची व जेवणाची मोफत सुविधा आ.कुणाल पाटील यांच्यामार्फत पुरविण्यात आली होती. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय मदतीसाठी वैद्यकीय कक्षही सुरु केलेला होता.भव्य रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाला माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्यासोबत सौ.लताताई रोहिदास पाटील, माजी खा.बापू चौरे,आ.कुणाल पाटील,सौ.अश्‍विनीताई कुणाल पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,उपसभापती योगेश पाटील,माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे,साबीर खान, महेश घुगे, पं.स.माजी सभापती भगवान गर्दे, सुतगिरणी व्हा.चेअरमन प्रमोद जैन,डॉ.दरबारसिंग गिरासे, डॉ.एस.टी.पाटील, मुख्य समन्वयक विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, अ‍ॅड.बी.डी.पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, धुळे शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ.अनिल भामरे,प्रफ्फूल सिसोदे, माजी पं.स.सदस्य अविनाश महाजन, छोटू चौधरी,अशोक सुडके,जि.प.सदस्य अरुण पाटील, बाजार समितीचे संचालक एन.डी.पाटील,नाना शिंदे,ऋषी ठाकरे,सौ.नयना पाटील,गंगाधर माळी,रावसाहेब पाटील,कुणाल पाटील,सौ.छाया पाटील,विशाल सैंदाणे,विजय चिंचोले,संभाजी देवरे, खरेदी विक्रीचे व्हा.चेअरमन दिनकर पाटील,संचालक बापू खैरनार, युवा नेते सागर पाटील,चि.रायबा कुणाल पाटील,सोमनाथ पाटील, सौ.अर्चना पाटील,संतोष पाटील,भानुदास गांगुर्डे, काँगे्रस तालुकाध्यक्ष भगवान पाटील,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, दिपक कोतेकर, शिंंदखेडा येथील प्रकाश पाटील,राजेंद्र देवरे, दिनेश माळी, सौ.संगिताताई पाटील, डॉ.संदिप पाटील,राजेंद्र खैरनार,किरण नगराळे, जगन्नाथ जाधव,शिवाजी पाटील,भानुदास माळी,सुनिल चौधरी,राजीव पाटील आदी उपस्थित होते.बेरोजगार मेळावा उद्धाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवी जगदिश देवपूरकर,डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांनी केले.