Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा तालूका खरेदी विक्री संघ बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील नेतृत्वाचा सत्कार समारंभांचे आयोजन

तळोदा दि ११(प्रतिनिधी) तालुका सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल नवनिर्वाचित चेअरमन गोविंद पाटील उर्फ (विश्वास आण्णा) यांच्या वतीने तळोदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुका बिनविरोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे  आमदार  राजेश दादा पाडवी साहेब यांचा सत्कार करण्यात आला. 
            यावेळी, सत्कारमूर्ती, बापूसाहेब दीपक पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी , भरतभाई माळी, विश्वासांना पाटील सो यांचा देखील आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभ कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार राजेश पाडवी साहेब म्हणाले, 
           तळोदा शहरातील परंपरा कायम ठेवत खरेदी विक्री संघ कृषी उत्पन्न बाजार समिती केल्याने तालुक्यातील सहकार क्षेत्राला चालना मिळत शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असेल.भाजपा शिवसेना युतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे. नुकत्याच राज्याचा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवत राज्याचा अर्थसंकल्प जलपुरुष   देवेंद्रजी फडणवीस  यांनी मांडला. या अर्थसंकल्पात राज्याच्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजनांचा शुभारंभ करण्यात आला आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये सन्मान निधी म्हणून मिळणार आहे. पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा मिळण्याची तरतूद करण्यात आली. 
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना माध्यमातून दुर्दैवी अपघात झाल्यास दोन लाख रुपयाचा चेक सरकारच्या वतीने देण्यात येईल. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात देखील वीज व पाण्याबद्दल गुजरात पॅटर्न राबविण्यात यावा यासाठी सरकार दरबारी मी प्रयत्न करणार आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवत आभार व्यक्त केले. आमचे प्रेरणास्थान कै. अण्णासाहेब पिके पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेले सारंगखेडा आणि प्रकाशा येथील बॅरेजचे साठवलेले पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बांधापर्यंत पोहोचण्यासाठी बापूसाहेब दीपक पाटील व स्वतः मी सातत्याने सरकार दरबारी हा विषय लावून धरलाय, येत्या अधिवेशनात हा विषय सुलवाडा बॅरेज प्रमाणे सारंखेडा आणि प्रकाशा बॅरेज देखील निविदा निघतील यासाठी राज्य सरकार सकारात्मक भुमिकेत आहे.
         यावेळी कार्यक्रमाला,तालुक्यातील खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन पूरूषोत्तम चव्हाण संचालक अरूण मगरे, प्रकाश माळी, गौतम जैन सूरेश इंद्रजीत , शहादा व निझर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने  महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.