Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदिवासी बालिका स्नेहा पावरा हिचे प्रोॲक्टीव अबॅकस विभागीय परीक्षेत यश, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

आदिवासी बालिका स्नेहा पावरा हिचे प्रोॲक्टीव अबॅकस विभागीय परीक्षेत यश,


धडगाव दि २७ (प्रतिनिधी) प्रोॲक्टीव अबॅकस ( Proactive Abecus) संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या विभागीय परीक्षेत श्री.विघ्नहर्ता अबॅकस सेन्टर, धडगांव येथील 19 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यातील 10 दहा विद्यार्थ्यी वेगवेगळ्या गटातून विजयी झाले. लहानपणापासून अभ्यासाची आणी गणिताची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने प्रोॲक्टीव अबॅकस या संस्थेव्दारे स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेच्या विभागीय पातळीत धुळे, जळगाव, नंदुरबार येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात श्री.विघ्नहर्ता अबॅकस सेन्टरचे दहा विद्यार्थ्यी यशस्वी झाले आहे. त्यात LA category 4 th Std या गटात  स्नेहा बटेसिंग पावरा विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे. स्नेहा बटेसिंग पावरा ही उमराणी ता. धडगाव ची रहिवासी कटल्ले खेतपाडा जि. प शाळेची विद्यार्थिनी असून  नाशिक विभागाचे STI अधिकारी रणजित पावरा व माधुरी पावरा यांची भाची आहे.  परीक्षेत इतर यश मिळवलेले विद्यार्थी हर्षवर्धन सागर शिंदे , लावण्या गोपाल मोरे, आरोही विजय पावरा, कविता जेठाराम मानवी, आरव हेमंत लोहार , जिया हडमनराम पटेल, प्रिन्सेस उमेश पाडवी, वासुदेव शामलाल पंचारीया, सुयोग रूपसिंग पावरा हे आहेत. विघ्नहर्ता अबॅकस सेंटर ईश्वर शिंदे उषा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल स्नेहा बटेसिंग पावरा हिचे धडगाव परिसरातुन अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.