शहादा तालुक्यातील समस्त मराठा समाजातील वर्ष २०२३ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन करण्यासाठी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी व समाज एकत्रीकरणासाठी शहादा तालुक्यातील मराठा युवा पर्वाच्या माध्यमातून गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अभीजीत दादा मोरे, उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण भाऊ कदम सामाजिक कार्यकर्ते शाम भाऊ जाधव, अध्यक्ष, मराठा समाज, तळोदा नवनवीतभाऊ शिंदे, जिल्हाध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार नितीन जगताप अध्यक्ष मराठा युवा मंच,नंदुरबार हरुशभाऊ हराळ, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार दिपक काळे, परिवर्तन चळवळ विठ्ठल मराठे, नंदूरबार
यावेळी मराठा समाजाचे उपसरपंच मनीष पवार, घनश्याम मराठे, दशरथ कदम, ताराचंद शिंदे, प्रशांत हराळ, निशा दिनेश मराठे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश तट्टे व आभार सागर मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत कदम, कमलेश शिंदे, किरण पवार, विशाल वाळे, राहुल मराठे, पियुष मराठे, प्रदिप वाळे, मोहन मोरे, रुपेश गांगुर्डे, प्रदिप माने, रुपेश मराठे, हिंमाशु मराठे इत्यादींत मेहनत घेतली. यावेळी मराठा समाजाचे समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.