खान्देशातील तेरा शाळांना लॅपटॉप चे मोफत वितरण
- रोटरी क्लब पूणे व युवकमित्र परिवार नंदुरबार यांचा उपक्रम
नंदूरबार दि २७(प्रतिनिधी) ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळावे,इंटरनेट वरील विविध माहिती मिळावी,विद्यार्थी संगणक साक्षर व्हावे यासाठी 'रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन ' व युवकमित्र परिवार नंदुरबार या संस्थेमार्फत धुळे,नंदुरबार,जळगाव जिल्ह्यातील तेरा शाळांना मोफत लॅपटॉप चे वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
संपूर्ण खानदेशात संगणक साक्षरता अभियान राबविणाऱ्या युवकमित्र परिवार संस्थेमार्फत दुर्गम व ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये मोफत संगणक कक्ष स्थापन करून विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचे कार्य करत असल्याचे यावेळी युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी सांगितले. याच उपक्रम अंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना लॅपटॉप वितरीत करण्यात येत असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. सदर उपक्रम यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनचे अभिजित म्हसकर, युवकमित्र परिवाराचे बादलसींग गिरासे,सुशील गव्हाणे,पत्रकार कल्पेश राजपूत यांचे सहकार्य लाभले.