राष्ट्रीय खेळाडू सौ.दिपाली साळुंके-शिंदे यांना "उत्तर महाराष्ट्र क्रिडारत्न" पुरस्कार प्रदान.
सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि २७
नाशिक जिल्हा शिवसेना आयोजीत उत्तर महाराष्ट्र क्रिडारत्न पुरस्कार सोहळा दि.25 जुन रविवार रोजी नाशिक येथे पार पडला. क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तळोदा शहरातील दिप स्पोर्टस अकॅडमी च्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडू व अनेक खेळात राज्यस्तरीय पदक विजेत्या सौ.दिपाली साळुंके-शिंदे यांना उत्तर महाराष्ट्र क्रिडारत्न पुरस्कार
पालकमंत्री नाशिक जिल्हा दादाजी भूसे ,सईद जलालुद्दिन रिझवी ऑलिंपियन, व अर्जुन पुरस्कार विजेते यांचा शुभहस्ते प्रदान करण्यात आला ह्या वेळी भाऊसाहेब चौधरी .
(उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख). हेमंत(अप्पा )गोडसे.(खासदार नाशिक.) राजु अण्णा लवटे.(शिवसेना सहसंपर्क प्रमुख.)
श्रीमती.सुनंदा पाटील.(उपसंचालिका, क्रिडा विभाग नाशिक.) प्रविण तिदमे (शिवसेना महानगर प्रमुख,नाशिक.)
डॉ.बलवंत सिंह.(अध्यक्ष ग्लोबल ह्यूमन रिसर्च अँड वेल्फेअर सोसायटी.) आनंद खरे. (शिवछत्रपती पुरस्कार विजेते.)
अजय बोरस्ते.(शिवसेना जिल्हाप्रमुख नाशिक.) अशोक दुधारे सर (शिवसेना जिल्हाप्रमुख क्रिडा नाशिक.)यांचा प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,