नंदूरबार येथे राजश्री शाहु महाराज जयंती निमित्त पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते समता रथाचा शूभारंभ
June 26, 2023
नंदूरबार दि २७(प्रतिनिधी)राजश्री शाहू महाराज यांची १४९वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जात आहे, तर या वर्षापासून राज्य सरकार समता दिन म्हणून साजरा केला. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती व्हावी यासाठी नंदुरबार शहरात समता रॅली काढण्यात आली, या रॅलीत छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती असलेल्या रथाच्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शूभारंभ करण्यात आला, शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण, समता, आणि बंधुता अशा अनेक गोष्टींसाठी शाहू महाराज यांनी केला आहेत.त्यासाठी आता राज्य सरकार देखील समता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या समता रॅलीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित, त्यासोबत मोठ्या संख्येने अधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.