तळोदा दि २७(प्रतिनिधी )
येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात येणाऱ्या आषाढी एकादशी, व बकरा ईद यानिमित्ताने शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती.
यावेळी व्यासपीठावर पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक राहुल पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार बागुल, कैलास चौधरी, विश्वनाथ कलाल आदि उपस्थित होते.
सदर या कार्यक्रमात पोलीस विभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे म्हणाले की, येणारे सण सर्वांनी शांततेत पार पाडावे, तळोदा शहर शांतता प्रिय असून दोन टक्के खराब लोकांमुळे (98% ) अठ्ठ्यानव टक्के चांगल्या लोकांना त्रास होत असतो कायद्याच्या चौकटीत राहून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील. गांजा व नेशिले पदार्थ विकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. तसेच बेकायदेशीर बाबींना थारा दिला जाणार नाही. शांतता कमिटीत मांडलेल्या विषयांचे निराकरण करण्यात येईल.असे त्यांनी आपल्या मनोगत सांगितले.
ज्ञयाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी शहरातील बेशिस्त वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांमुळे रहदारी ठप्प होते तर शहर पोलीस हे बायपास वर राहत असल्याने शहरातील वाहतुकीच्या अडथळा नेहमीच होत असतो म्हणून स्मारक चौक ते बस स्टॅन्ड या मार्गावर एक तरी शहर पोलीस कायमस्वरूपी नेमण्यात यावा अशी मागणी केली.
भाजपचे शहादा तळोदा विधानसभा प्रमुख कैलास चौधरी, शांतता कमिटीचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ कलाल, संग्राम दलाचे हिरामण पाडवी, उल्हास मगरे, याकुब पिंजारी, आदींनी आषाढी एकादशी व बकरा ईद शांततेत पार पाडण्यात येईल कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष अल्पेश जैन, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बापू पाटील, पोलिस पाटील सावित्री पाडवी, पोलिस पाटील, अशोक पाडवी, नगरपरिषदेचे राजेंद्र माळी, माजी नगरसेवक अमानुद्दीन शेख, मुस्लिम समाज अध्यक्ष आरिफ नुरा शेख, अकिल अन्सारी, नारायण ठाकरे, कलीम अन्सारी, मुन्ना कुरेशी, पत्रकार बांधव व शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.