Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदूरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त या संकल्पनेतून श्री सा वै वि वाण्याविहीर येथे तरूणांना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

अक्कलकुवा प्रतिनिधी-योगेश्वर बुवा
    अमली पदार्थ मुक्त नंदुरबार जिल्हा अंतर्गत तरूणांना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.
      अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील श्री सातपूडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात आज अमली पदार्थ सेवणामूळे होणारे मानवी जीवनावरील परिणाम या विषयावर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन अक्कलकुवा पोलिस ठाण्यामार्फत करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एच. के. पाडवी,तर प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक जे .एस झाल्टे, वरिष्ठ शिक्षक बी. टी. मगरे उपस्थित होते.
    अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवणामूळे होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश्वर बुवा यांनी केले तर शपथ वाचन विनोद पाटील यांनी केले.यावेळी विद्यार्थांची जनजागृती रॅली काढण्यात आली होती.यावेळी पोलिस नाईक किशोर वळवी,कपिल बोरसे ,आदिनाथ गोसावी ,प्रदिप वाघ, तुषार नाईक आदी उपस्थित होते.