शेठ के.डी. हायस्कूल, तळोदा येथे जागतिक आमली पदार्थ दिवस साजरा.
तळोदा दि २६(प्रतिनिधी)पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.२६ रोजी शाळेचे मुख्याध्यापक जे. एल.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आमली पदार्थ दिवस साजरा करण्यात आला.यावेळी तळोदा पोलीस स्टेशन अंतर्गत शहरांतून रॅलीचे आयोजन करण्यात आले.यातून शहरात अंमली पदार्थांमुळे आरोग्यावर दूष्परीणामवर जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक राहूलकूमार पवार होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचलन एस.आय.जोहरी यांनी केले.शेठ के.डी.हायस्कूल पासून तर तळोदा शहरातून तळोदा पोलीस स्टेशन पर्यंत रॅली काढण्यात आली.पवार सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अमितकुमार बागूल, शेठ के.डी.हायस्कूल चे मुख्याध्यापक जे.एल.सुर्यवंशी उपमुख्याध्यापक ए.बी.वायकर,पर्यवेक्षक पी.पी.पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.