Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारच्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण योजना केंद्र सरकारने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्याने जनतेमध्ये समाधान - भाजपा धडगाव विधानसभा प्रमुख नागेशदादा पाडवी

अक्कलकुवा दि २६( प्रतिनिधी)
 योगेश्वर बुवा 7057283888
      केंद्र सरकारच्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत 14 कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी झाल्यामुळे देशभरात अनेक योजना राबवून जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले असून त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असे प्रतिपादन आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा धडगाव विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेत केले.
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरित्या लोककल्याणकारी योजना राबवत नऊ वर्षे पूर्ण होत असून या नऊ वर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने केलेल्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी मोदी @९ हा कार्यक्रम देशभरात राबविला जात आहे.नऊ वर्षाच्या कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, उज्वला योजना ,सौभाग्य योजना , पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना ,सौर पंप योजना, आयुष्यमान भारत योजना, शेतकरी अपघात विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, संजय गांधी निराधार योजना ,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्टॅण्ड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत मिशन यासारख्या अनेक योजना देशभरामध्ये सुरू करून तळागाळातील लोकांपर्यंत या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम या शासनाने केले असून या अंतर्गत 14 कलमी कार्यक्रम राबविण्यात आले होते. व विशेष बाब म्हणजे शासन आपल्या दारी या अंतर्गत तालुक्यात देखील खापर, मोलगी ,अक्कलकुवा येथे कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आले व याचा फायदा जनतेला झाल्याचे नागेश पाडवी यांनी सांगितले. यावेळी अक्कलकुवा विधानसभा प्रभारी व माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी उपस्थित होते.