तळोदा दि ८(प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे यांनी विधानसभा निवडणुका २०२४ लक्षात घेता विधानसभा निवडणुक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते, माजी अनूसुचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, विशेष निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी नागेशदादा पाडवी यांची अक्कलकुवा विधानसभा मदारसंघाची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. याआधी त्यांनी सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे.भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामात, भाजयूमो जिल्हाध्यक्ष,भाजपा जिल्हाध्यक्ष ते प्रदेश कार्यकारिणी वर काम केले आहे. आता त्यांना विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे.
याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून अक्कलकुवा विधानसभा निवडणुक प्रमुख नियुक्ती केली आहे. जबाबदारीचा विश्वासाने पार करेन, पक्षवाढीसाठी व विधानसभा क्षेत्रात जाऊन समाजातल्या शेवटच्य माणसा पर्यंत "हर घर भाजपा" लक्ष पुर्ण करणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले