भारतीय जनता पक्षाने तळोदा येथे व्यापारी मेळावा आयोजन केले होते . यावेळी विजय चौधरी यांनी सांगितले की, पोलिस खात्यात काम करून देखील आमदार राजेश पाडवी यांनी सर्व व्यापारी जवळ आदर पूर्ण संबंध ठेवले आहेत.
व्यापारी हा अनेक प्रकारचे टॅक्स भरत असतो. पेन्शनचा विषय वरिष्ठांकडे मांडू, सीसीटीव्हीचा व इतर काही मागण्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू
असे सांगत नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात एकही घोटाळा झालेला नाही.व्यापारी बांधव योग्य वातावरणात व्यापार करू शकत आहेत. व्यापऱ्यांसाठी लघुउद्योग मंत्रालयाच्या मार्फत अनेक संधी उपलब्ध करुन दिल्यात.
तुषार रंधे यांनी सांगितले की, पूर्वीचा तळोदा शहर व आताचे शहर यात बराच बदल झाला असून यात आमदार राजेश पाडवी यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती झाली आहे. व्यापारी सर्वात जास्त टॅक्स देत आहेत त्यामुळे त्याचा विनियोग संदर्भात व इतर काही अडचणी असतील त्या जाणून घेण्यासाठी आज व्यापारी मेळावा घेण्यात आला असे सांगितले.
आमदार राजेश पाडवी - यांनी यावेळी बोलताना सांगितले की,कोरोनो काळात गाव पाडा पासून शहरात देखील व्यापारी मंडळींनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या आपण भक्कम पण उभे राहू शकलो.भाजपचा काळात तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले आहे.पार्किंग साठी सोय करून लवकरच वळण रस्त्याचे काम लवकर सुरू करू तसेच होकर्स झोन योग्य जागा बघून निर्माण करू शहरात सी. सी.टीव्ही साठी निधी उपलब्ध साठी प्रयत्न करू ,युवा पिढीला रोजगार कडे वळविण्यासाठी ज्या योजना आहेत त्या ताळागाळा पावेतो पोहचिण्यासाठी प्रयत्न करणार तळोदा भाजप शहर कडून व्यापारी मेळावा चे आयोजन आदिवासी सांस्कृतिक भंवनात पार पडले यावेळी संघटन महामंत्री विजय चौधरी, आमदार राजेश पाडवीी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे , माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, कैलास चौधरी. संजय माळी, राजेश राजपूत, गौतम जैन, रूपसिंग पाडवी,तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी,नारायण ठाकरे, बळीराम पाडवी, सतीश वळवी, किर्तिकुंमार शाह, गणेश सोनार,आनंद सोनार शहरातील व्यापारी उपस्थित होते.
राजेंद्र राजपुत यांनी तळोदा शहरासी.सी.टीव्ही.बसविण्यात यावे अशी मागणी व्यापारी संघटने कडून केली.
. कार्यक्रमाचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष जैन यांनी केले सुत्रसंचलन अविनाश मराठे यांनी केले
व्यापारी कडून व्यक्त केलेल्या अपेक्षा -
मनोज भामरे -
तळोदा शहरात सी सी टीव्ही मध्ये चोर दिसतात मात्र त्यांचा तपास लागत नाही तसेच पावाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने दुकानात पाणी शिरून नुकसान होते. शहरात ग्राहकांचा वाहन साठी पार्किंग साठी सोय नसल्याने होकर्स झोन तयार करण्यात यावा. तसेच
विमा कवच मिळावे अश्या विविध मागण्या केल्या.
पंडित भामरे (व्यापारी)
प्रजेचे हित जो राज्यकर्ता पाहतो व्यापारी त्याचा सोबत उभा राहतो .व्यापारी संघाची व्यथा वर वरपावेतो पोहचणे आवश्यक असल्याचं सांगितले.
गौतम जैन -
व्यापारी चे नुकसान झाल्यास भरपाई मिळत नाही.
धान्य व्यापारी चे पावसाळ्यात नुकसान झाल्यास तुटपुंजी आर्थिक मदत मिळते त्यामुळे नुकसान भरपाई देताना योग्य पद्धतीने मिळावे. निवृत्त वेतन मिळाले अशी अपेक्षा व्यक्त केली.