आमदार राजेश दादा पाडवी साहेब यांचा उपस्थितीत ता भोगरा या गावी ग्रामस्थाचे उपस्थितीत"वस्ती बैठक" घेत तेथील नागरिकांशी संवाद साधत ग्रामविकासाचा संदेश दिला.येणाऱ्या जुलै महिन्यापर्यंत त्या गावात बौद्ध विहार करण्याचा प्रयत्न असेल असा आमदार पाडवे साहेबांनी सांगितले
आमदार राजेश पाडवी आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्यात कार्यकुशल आमदार म्हणून परिचित आहेत.कोणी काम सांगितले आणि ते झाले नाही असे कधी होत नाही, आपल्या मतदारसंघात ते शहर गाव पाडा ते वाडी वस्ती च्या समस्यांवर लक्ष देतात.याचाच परिचय छोटं.याशा भोगरा वस्तीत आला. गावातील दलित वस्तीच्या विकास कामासंदर्भात गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे.ते काम करण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी शब्द दिला आहे.
यावेळी, सरपंच दिनेश पावरा, उपसरपंच कोकिळाबाई, अजय पान पाटील,जगदीश आकडे, मुकेश आगळे, उमेश पानपाटील, पुनमचंद पानपाटील, राकेश आगळे, महेंद्र इंगळे, पंकज पवार, प्रकाशपवार, विनोद जैन, प्रदीप ठाकरे, गोपाल गांगुर्डे, किरण ,विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, भिम शक्ती युवा संस्था भोंगरा युवा मित्रपरिवार, महिला, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.