Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विधानमंडळातील योगाभ्यास

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि२१
              विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योगाभ्यासाकरता आम्हा सर्वांना विधान मंडळात निमंत्रित केले होते. आम्ही सकाळी योगाभ्यास केला. असाच योगाभ्यास सगळ्या पक्षांनी मिळून एकत्रित केला तर विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालेल. अध्यक्षांना फार त्रास होणार नाही ! असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
               मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आजच्या 'आंतरराष्ट्रीय योग दिना'निमित्त विधान भवन, मुंबई येथे आज सकाळी 'योग प्रभात' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
मा. राज्यपाल रमेश बैसजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधान सभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विरोधी पक्ष नेते, आमदार, मुंबईकर भगिनी-बंधू, विद्यार्थ्यी यांच्यासह योगासन केले. 
           जगातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये आज 'योग दिवस' साजरा होत आहे. स्वतः मा. मोदीजी आज अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघात 150 देशांच्या प्रतिनिधींसोबत 'योग दिवस' साजरा करत आहेत. योग ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धत आहे. विशेषत: रोग होऊच नयेत, यासाठीचे हे प्रभावी शास्त्र आहे. जीवनात आज आपण ताणतणावांचा सामना करत असतो. धावत्या जीवनशैलीमुळे अनेक रोगांचा सामना करावा लागतो. अशावेळी योग हा प्रभावी उपाय आहे. योगाचा आरोग्य लाभ सर्वांना व्हावा, स्वस्थ भारत तयार व्हावा,अशी सदिच्छा व्यक्त केली.