नंदूरबार दि २१ (प्रतिनिधी) जागतिक योगा निमित्ताने आज नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट या ठिकाणी नववा योगा दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या योग दिवस संपूर्ण भारतात योगा करून साजरा केला जात आहे.या योग दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले योग शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणते.
खासदार डॉ हिनाताई म्हणाल्या जागतिक योग दिनानिमित्त आपल्या सर्वांचे स्वास्थ्य उत्तम राहो, आज पुन्हा एकदा निरोगी आयुष्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प घेऊया.दररोज वीस मिनिटे योग करणार.
या योगा दिनाच्या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रियाताई गावित, संसद रत्न खासदार हीनाताई गावित, भाजपा प्रदेशाचे नेतृत्व विजयभाऊ चौधरी, जिल्हा परिषदेच्या सदस्य जयश्रीताई गावित, यांच्यासह मोठ्या संख्येने योगा करणारे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.