Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना देण्यासाठीचे पंधरा लाख त्रेपन्न हजार रुपये व्यापा-याचा घरातुन चोरी

शहादा दि २१(प्रतिनिधी) श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिल शहादा पंधरा लाख त्रेपन्न हजार रुपये चोरीला गेले असून शहादा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.
          पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील रोहीदास पाटील वय ५८ धंदा व्यापार रा गायत्री पार्क लोणखेडा ता शहादा यांनी फिर्याद दिली असून दि १९ ते २० जुनच्या दरम्यान अज्ञात इसमाने फिर्यादीच्या श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिल शहादांच्या ऑफिसमधील ड्राव्हर व एका छोट्या कपाटामध्ये शेतकऱ्यांना देण्यासाठी ठेवलेले १५,५३००० हजार रुपये कोणातरी अज्ञात चोरट्यांने ऑफिसचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून चोरुन नेले.याबाबत भादवि कलम ३८० प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोसई छगन चव्हाण करीत आहेत.