तळोदा दि २१ (प्रतिनिधी) भारतीयांनी सार्या जगाला दिलेली अत्यंत महत्वपूर्ण देणगी म्हणजे "योग". नियमित केलेल्या योगासनांचे फायदे नक्कीच होत असतात. शरीर,मन आणि श्वासोच्छवासाच्या माध्यमातुन केलेली ही संतुलित प्रक्रिया बर्याच अंगांने फायद्याची ठरते. असे प्रतिपादन 21 जून जागतिक योग दिवशी आमदार राजेश दादा पाडवी यांनी केले.
तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला .जागतिक योग दिवसाच्या औचित्य साधून योग गुरु सेवानिवृत्त प्रा आर ओ मगरे , जिल्हा संयोजक योग शिक्षक नवनीत शिंदे, योगशिक्षक किरण पाटील यांनी योगाचे महत्त्व तसेच योगाचे फायदे समजून लोकांना योग प्रशिक्षण दिले कार्यक्रमास शहादा तळोदाचे आमदार राजेशदादा पाडवी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी शहादा तळोदा विधानसभा प्रभारी कैलास चौधरी भाजपा नंदुरबार जिल्हा महामंत्री बळीराम वळवी, भारतीय जनता पार्टीचे शहादा तळोद्याचे प्रभारी नारायण ठाकरे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, सरपंच असोसिएशन तळोदा तालुका अध्यक्ष दारासिंग पावरा, माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी, श्याम राजपूत डॉ स्वप्निल बैसाणे माजी नगरसेवक जितेंद्र माळी, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी से नि प्राचार्य अरुण मगरे जेष्ठ योग शिक्षक एक व्ही कलाल, परिभाई वाणी,योगेशभाऊ पाडवी, दरबारसिंग पाडवी श्रीमती निलाबेन मेहता सौ आभाबेन वाणी लक्ष्मण वाघ, संजय माळी, गोविंदा पाडवी, युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश चव्हाण, ठेकेदार रमेश आप्पा भोई आदींनी योग प्रशिक्षणाच्या लाभ घेऊन सहकार्य केले तसेच आमदार राजेश दादा पाडवी यांनी योगाचे महत्त्व पटवून जागतिक योगाची सुरुवात 21जून 2014 ला जगात जागतिक योग दिवस नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत देशाचे यांनी जगात साजरा करावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजूरी घेतली आहे जागतिक योग दिवसाचे सूत्रसंचालन हेमंत सूर्यवंशी व कार्यक्रमाचे आयोजन हेमलाल मगरे सर सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांनी केले.