Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अंध व्यक्तींसाठी काठी, कर्णबधिर व्यक्तींसाठी कानाचे मशीन, व्हील चेअर, टॉयलेट पॉट आणि इतर साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम पार पडला.

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि२३ 
             दिव्यांग बांधवांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या साहित्याचे वाटप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा हस्ते केले. कर्जत येथे साहित्य वाटप उपक्रमात दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल देण्यात आली. माझ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये राबवण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून गरजू दिव्यांगांना हे विविध साहित्याचे वाटप केले जात आहे. 
             अंध व्यक्तींसाठी काठी, कर्णबधिर व्यक्तींसाठी कानाचे मशीन, व्हील चेअर, टॉयलेट पॉट आणि इतर साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
         याप्रसंगी आमदार महेंद्रशेठ थोरवे, संतोष भोईर, संभाजी जगताप, शिवराम बदे, अमर मिसाळ, संदेश पाटील, शशिकांत देशमुख, अमर साळूंके व तालूक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी दिव्यांग बांधव उपस्थित होते.