Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुतगिरणी कामगारांच्या ६ मागण्या मान्य;संप मागे घेण्याचा विचार सुरू

सुतगिरणी कामगारांच्या ६ मागण्या मान्य;संप मागे घेण्याचा विचार सुरू 

भविष्य निर्वाह निधी बरोबर मागील व चालू वर्षाचा बोनस कामगारांना मिळणार!


शहादा दि ३०(प्रतिनिधी) आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक २२ ऑगस्ट २०२३ पासून सुतगिरणीतील कामगारांनी सुरू केलेला बेमुदत संप नवव्या दिवशीही सुरूच आहे.पीएफ मिळावा,मागील व या वर्षीचा बोनस मिळावा,पगार वेळेवर मिळावा,इंडेक्स नंबर लावण्यात यावा,ग्रॅज्युएटी मिळावी,दवाखाना सुरू करावा,कॅन्टीन सुरू करावे,महीलांना रात्रीची १२ ते ८ ची ड्यूटी देऊ नका,पतपेढीत व बॅकेत कर्जाचे हप्ते पोहचवा,वर्षाला २५ रजा द्या,पिण्याच्या पाण्याची सोय करा,रिटायर्ड कामगारांना पेन्शन द्या,सुतगिरणीचे झाडे तोडून विकू नका,सुतगिरणीचे सामान भंगारच्या भावाने विकू नका,शेतक-यांचे कापसाचे पैसे द्या,कामगारांचे पैसे द्या इत्यादी मागण्यांसाठी हा संप सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा गेटसमोर सुरूच आहे.
             आज सुतगिरणीचे एमडी राजाराम पाटील यांच्याशी सुतगिरणी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.चालु वर्षाचा ५ महिन्यांचा पीएफ भरणार, माहे ऑगस्ट पासून इंडेक्स नंबर लावणार, माहे सप्टेंबर पासून एक पगारी रजा लावणार, बदली कामगारांना कायम स्केल लावणार, सन २०२१ ते २०२२ व चालू वर्षाचा बोनस दिनांक ८ ते ९ नोव्हेंबर रोजी देणार, कामगारांना प्रत्येक महिन्याचा पगार ५ ते ६ तारखेला देणार, माहे ऑगस्ट पासून प्रत्येक महिन्याचा पीएफ १५ ते १७ तारखेला भरणार, मागील वर्षीचा बोनस चेक दिनांक ३० ऑगस्ट ला दिला आहे. अशा एकूण ६  मागण्या मान्य करण्यात आल्या आहे.म्हणून हा बेमुदत संप मागे घेण्याचा विचार आम्ही करीत आहोत,परंतु आज संप सुरूच राहणार आहे,उद्या पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत, अशी माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष जगन निकुंभ व उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी दिली आहे.