🌹प्रेमवेडाने रेंगाळलेली मी🌹
जीवनाच्या संकटांनी वेढलेली मी
क्रांतिकारी भावनेने पेटलेली मी
माणसांची साथ नाही लाभलेली मज
वेदना अन संकटानी हारलेली मी
भावनांच्या भोवताली सावल्या होत्या
भास होती सावरे ना गोठलेली मी
जाणल्यावर बेगडी जर अश्रू प्रेमाचे
प्रेमवेडाने तरी रेंगाळलेली मी
गीत सौख्याचे सदा मी गात असते अन्
दूर माझ्या काळजीला सारलेली मी
डाॅ. रेखा देशमुख
पुणे
मो. 9810593090
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=